|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » ‘किया मोटर्स’ची ‘सेल्टॉस’ भारतात लाँच

‘किया मोटर्स’ची ‘सेल्टॉस’ भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘ह्युंदाई’ची उपकंपनी असलेल्या ‘किया मोटर्स’ने भारतात आपला पाय रोवला आहे. किया मोटर्सने भारतात आपली पहिली कार ‘सेल्टॉस’ लाँच केली आहे.

अत्याधुनिक फिचर्सने परिपूर्ण अशी ही कार असून, टेक लाईन आणि जीटी लाईन या दोन व्हर्जनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये बीएस-6 प्रणलीनुसार, तीन इंजिन प्रकार देण्यात आले आहेत. 1.4 लीटर जीडीआय टर्बो पेट्रोल, 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

1.4 लीटर जीडीआय टर्बो पेट्रोल इंजिन 138 बीएचपी आणि 242 इनएम टॉर्क उत्पन्न करते. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7 स्पीड ऍटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन 0 ते 100 किमीचा वेग 9.7 सेकंदात घेते.

कारमध्ये 10.25 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. 6 एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, पार्किंग सेन्सर, ब्लाईंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच नॉर्मल, इको आणि स्पोर्ट मोड देण्यात आले आहेत.

16 जुलैपासून कंपनीने भारतात या कारचे बुकींग सुरू केले होते. आतापर्यंत 23 हजारांवर कारचे बुकींग झाले आहे. भारतात 160 शहरांमध्ये कंपनीने 192 डिलरशीप उघडल्या आहेत. या कारची किंमत 9.69 लाखांपासून सुरू होणार आहे. तर डिझेलच्या ऍटोमॅटीक मॉडेलची एक्सशोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.