|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीलंकेमार्गे भारतात घुसले सहा दहशतवादी, हाय अलर्ट जारी

श्रीलंकेमार्गे भारतात घुसले सहा दहशतवादी, हाय अलर्ट जारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

श्रीलंकेमार्गे तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये घुसलेल्या या सहा दहशतवाद्यांमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या पाच तर एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. तमिळनाडू पोलिसांना काही संशयित घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. यापूर्वीही पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. तेव्हाही घातपाताच्या शक्यतेने 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

Related posts: