|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘मोटोरोला वन ऍक्शन’ लाँच

‘मोटोरोला वन ऍक्शन’ लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध मोबाईल कंपनी ‘मोटोरोला’ने ‘मोटोरोला वन ऍक्शन’ हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

या स्मार्टफोन मध्ये ऍन्ड्राईडचे अद्ययावत व्हर्जिन आहे. या फोनमध्ये पहिल्यांदाच अल्ट्रा-वाइड ऍक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. मोटोरोला वन ऍक्शनसोबत कंपनीने व्हिडिओ कॅमेऱयावर फोकस केला आहे. 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर देण्यात आला आहे. हा कॅमेरा 117 डिग्री व्हयूसह अल्ट्रा-वाईडमध्ये व्हिडिओ शूट करतो. याव्यतिरिक्त 6.3 इंचाचा डिस्प्ले, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.