|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डेंग्यु: आरोग्य विभागास सतर्कतेचे आदेश

डेंग्यु: आरोग्य विभागास सतर्कतेचे आदेश 

औषधांचा तुटवडा भासवू नका- सीईओ अमन मित्तल

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर ग्रामीण भागात डेंग्युचा फैलाव सुरु आहे. आतपर्यंत तिघांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औषधांचा तुटवडा भासवू नका अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांना दिले.

  शाहूवाडी तालुक्यातील वाडीचरण येथील एका युवतीचा औषधोपचारा दरम्यान  गुरुवारी डेंग्युने मृत्यू झाला. तर जिल्हय़ातील पूरबाधित काही गावात डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, सुभाष सातपुते, प्रसाद खोबरे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यानंतर मित्तल यांनी आरोग्य यंत्रणेस सूचना केल्या. जिल्हय़ातील 35 गावात धूर फवारणी मशिन देण्यात आली असून गरज पडल्यास आणखी मशिन खरेदी करण्यास ग्रामपंचातीना सूचन देत असल्याचेही त्यांनी  सांगितले. आतापर्यंत जिल्हा परिषदेचे महापुरामुळे 346 कोटींचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती शासनाला कळवण्यात आली आहे. असेही मित्तल यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज जागतिक बँकेसमोर सादरीकरण

राज्यात कोल्हापूर, सांगलीसह काही जिल्हय़ात महापुराने घरांची पडझड झाली. शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याची पुन्हा उभारणी करण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून मदत मिळवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सरकारच्या वतीने मुंबईचे आयुक्त प्रविण परदेशी शुक्रवारी नवी दिल्ली येथे निधी मिळवण्यासाठी सादरीकरण करणार आहेत. अशी माहिती सीईओ मित्तल यांनी दिली.

10 गावात टँकरने पाणी

महापुरामुळे बहुतांशी गावातील पिण्याच्या पाणी योजना बंद होत्या. त्यापैकी काही गावातील योजना अद्याप नादुरुस्त आहेत. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यानच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी 10 गावात टँकरची सोय करण्यात आली आहे. गरज पडल्यास आणखी टँकर देण्याची तयारी असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

जि.प.आरोग्य विभागास सतर्कतेचे आदेश

Related posts: