|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाहूपुरीतील कुंभारगल्ली उजळली!

शाहूपुरीतील कुंभारगल्ली उजळली! 

मुंबईचे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.शेखर प्रभावळकर यांची सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महापुरामुळे शाहूपुरीतील पुंभार गल्लीत पाणी घुसले होते. महापुराच्या पाण्यातून आलेली घाण, गाळ आणि कचरा यामुळे कुंभारगल्लीतील नागरिक आणि कुंभार बांधव हैराण झाले हेते. गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामावरही परिणाम झाला होता. घरांचे नुकसान होण्याबरोबरच वीज पुरवठाही खंडीत झाला होता. अशा स्थितीवर मात करत गणेशमूर्ती तयार करण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱया पुंभार गल्लीतील मूर्तीकारांसह नागरिकांना बुधवारी 180 एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर प्रभावळकर (रा. शिवाजी पार्क, मुंबई) यांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा भागातील पूरग्रस्तांना विविध वस्तू रूपात मदत केली आहे. कोल्हापुरात एलईडी बल्बची मदत करण्याची इच्छा त्यांनी आपले स्नेही निवृत्त आयकर उपआयुक्त किशोर सातोसकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार किशोर सातोसकर यांनी ‘तरुण भारत’ परिवाराच्या मदतीने बल्बचे वितरण केले. किशोर सातोसकर आणि ‘तरुण भारत’चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते शाहूपुरी कुंभारगल्लीतील पूरग्रस्त कुटुंबांना एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले. यावेळी ‘तरुण भारत’चे  प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, प्रतिनिधी कृष्णात पुरेकर, नंदकुमार तेली यांच्यासह मूर्तीकार सतीश वडणगेकर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

Related posts: