|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुन्ना देसाई, बाबू म्हाप यांच्यासह 40 जणांवर गुन्हा

मुन्ना देसाई, बाबू म्हाप यांच्यासह 40 जणांवर गुन्हा 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

उबेद हेडेकर हल्ला प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर हुल्लडबाजी करत मिरवणूक काढल्याप्रकरणी  मुन्ना देसाई, बाबू म्हाप, सागर म्हापूसकर यांच्यासह 40 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े बेकायदेशीर जमाव व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आह़े

  बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने मुन्ना देसाई यांच्यासह 11 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. सुमारे 11 महिन्यानंतर कारागृहातून मुक्तता होणार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱयासह, संशयितांच्या समर्थकांची मोठी गर्दी जिल्हा विशेष कारागृहाबाहेर केली होती. मुन्ना देसाई व सर्व संशयित जेलमधून बाहेर येताच मोठा जल्लोष करण्यात आल़ा यावेळी  ‘कोण आला रे कोण आला हातखंब्याचा वाघ आला’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्य़ा तसेच दुचाकी व चारचाकी गाडय़ांच्या ताफ्यासह हातखंबापर्यंत मिरवणूक काढण्यात आल़ी  यावेळी गाडय़ांचे हेडलाईट, इंडिकेटर चालू ठेवून घोषणाबाजी सुरू होती. या सर्व घटनेचे छायाचित्रिकरण पोलिसांना प्राप्त झाल्यांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल़ी  सार्वजनिक शांतता भंग करून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आह़े

  उबेद होडेकर हल्ला प्रकरणामध्ये मुन्ना देसाई सुमारे 11 महिने कारागृहात होते.  न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जदेखील फेटाळून लावला होत़ा  मात्र या प्रकरणात सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता झाल्याने समर्थकांनी जल्लोष केला. मात्र बाहेर आल्यानंतर आता सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी देसाई यांच्या अडचणीत वाढ झाली आह़े भादंवि कलम 149, 279, 336 143 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम व मोटार वाहन कायदाप्रमाणे देसाई, बाबू म्हाप व अन्य 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत़  .