|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चतुर्थीच्या काळात बंद घरांची माहिती पोलिसांना द्या

चतुर्थीच्या काळात बंद घरांची माहिती पोलिसांना द्या 

प्रतिनिधी/ म्हापसा

चतुर्थी काळात आपली घरे बंद करून परगावी जाणाऱयांनी आपल्या बंद घराची माहिती पोलिसांना द्यावी, घरात रोख रुपये व दागिने ठेवू नये असे आवाहन म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी केले आहे.

म्हापसा पोलीस स्थानकात पोलीस अधिकारी व बार्देश तालुक्यात असलेल्या 14 सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष पदाधिकाऱयांची चतुर्थीच्या काळात घेण्यात येणारी खबरदारी विषयी चर्चा करण्यात आली. म्हापसा बाजारपेठेत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी बाहेर जाण्यासाठी जास्त प्रवेशद्वार खुले ठेवावे अशी मागणी यावेळी निरीक्षक कपिल नायक यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात येणाऱयावर लक्ष ठेवण्यासाठी मागणी पोलिसांनी केली. सार्वजनिक गणेशोत्सव पदाधिकाऱयांनी त्याठिकाणी आपले व्हॉलेंटियर नेमावेत त्याना ओळख पत्रे द्यावीत जेणेकरून पोलीस व त्यांच्या सहकार्याने सर्व हालचालिवर लक्ष ठेवता येईल. देवदर्शनासाठी रांगेत सर्वांना सोडावे, पार्कींग व्यवस्था योग्यरित्या करावी याबाबत चर्चा झाली.

सर्वत्र विद्युतरोषणाई करावी अशी मागणी निरीक्षकांनी केली. पहाटेच्यावेळी तसेच रात्री उशीरा फटाके लावण्याचा प्रकार शक्यतो टाळावा असे ते म्हणाले. फायर एस्टींगविशर ठेवावा. वीजपुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष द्या. रात्रीच्यावेळी शक्य असल्यास खासगी सुरक्षारक्षक ठेवावेत. काही संशयास्पद आढळल्यास व वाटल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सर्व कार्यक्रमाची माहिती पोलिसांपर्यंत पोचवावी, रात्रीrच्यावेळी मोठय़ाने म्युझिक वाजवू नये असेही त्यांनी सांगितले.

बॉक्स करणे

विसर्जनादिवशी म्हापशातील बार बंद ठेवण्याची मागणी

म्हापसा अलंकार थिएटर जवळील बार विसर्जनादिवशी रात्री उशीरापर्यंत सुरू असतात जेणेकरून काहीजण मद्यप्राशन करून दंगामस्ती करतात. त्यामुळे सार्वजनिक गणपतीविसर्जन दिवशी येथील बार बंद करावीत अशी मागणी यावेळी देवस्थानच्या पदाधिकाऱयांनी केली असता पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी याबाबत आपण त्या सर्व बार मालकांशी बैठक बोलावून तशी माहिती सूचित करतो असे सांगितले. चतुर्थीच्या काळात वाहने सावकाश हाका व सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन निरीक्षक नायक यांनी केले. 

रात्री 12 पूर्वी गणेशमूर्ती विसर्जन करा

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव रात्री 12 वाजण्यापूर्वी विसर्जित करावे अशी मागणी यावेळी श्रीगणेश मंडळ पर्राचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर यांनी केली असता यावर चर्चा होऊन शक्यतो लवकरात लवकर गणेशमूर्ती विसर्जित कराव्या जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही असे सूचित करण्यात आले. निरीक्षक कपिल नायक यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत काही समस्या असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या बैठकीला शंभू फडते, दत्ताराम पेडणेकर, जयेश नाईक, व्यंकटेश गावठणकर, एकनाथ शेटगांवकर, सखाराम खोर्जुवेकर, सुशांत मडगांवकर, सुरेश कट्टीगिरी, रुपेश कवळेकर आदी सार्वजनिक गणेशोत्सवातील पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: