|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हणकोण सातेरी देवीचा नव्याचा उत्सव 5 सप्टेंबरपासून

हणकोण सातेरी देवीचा नव्याचा उत्सव 5 सप्टेंबरपासून 

प्रतिनिधी/ पणजी

हणकोण कारवार येथील श्री सातेरी देवीचा नव्याचा वार्षिक उत्सव 5 ते 11 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. वर्षातून एकदाच उघडण्यात येणारे मंदिराच्या गाभाऱयांचे द्वार 5 सप्टेंबर रोजी उघडण्यात येईल. उत्सवाची सांगता 11 रोजी संध्याकाळी 5 वाजता देवीला नवे अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. 6 रोजी संध्याकाळी 4 वाजता कुळाच्याच्या कुमारीकांनी व स्त्रियांनी अडेकी आणि पुरुषांनी तळई देण्याचा कार्यक्रम होईल. 7 रोजी संध्याकाळी 6.30 ते 9.30 पर्यंत भक्तमंडळी काणकोणचा भजनाचा कार्यक्रम होईल. 8 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर सध्याकाळी 6.30 ते 9.30 पर्यंत रामदास रायकर आणि मंडळीचा भजनाचा कार्यक्रम होईल. 9 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. त्यानंतर 6.30 ते 9.30 पर्यंत ओंकार भक्तीसंगीत मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

10 रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6.30 ते 9.30 यावेळेत राया बांदेकर यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व सेवा स्विकारल्या जातील. त्यानंतर 5 वाजता गाभाऱयाचे द्वार बंद करण्यात येईल. 6 सप्टेंबर रोजी बाहेरील भक्तमंडळीकडून कुठलाही सेवा स्विकारली जाणार नाही. रोज सकाळी 9 वाजल्यापासून देवीला अर्पण केलेल्या वस्तुंचा जाहीर लीलाव केला जाणार आहे. त्यानंतर रात्री 9.30 वाजता आरती होणार आहे.

Related posts: