|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Automobiles » ‘हार्ले डेव्हिडसन’ ची पहिली इलेक्ट्रिक बाईक होणार लाँच

‘हार्ले डेव्हिडसन’ ची पहिली इलेक्ट्रिक बाईक होणार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी ‘हार्ले-डेव्हीडसन’ ही आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच करणार आहे. ‘लाईव्हवायर’ असे या बाईकचे नाव असून, येत्या 27 ऑगस्ट रोजी ती भारतात सादर होईल.

‘हार्ले-डेव्हीडसन’ ही प्रिमियम श्रेणीतील बाईक निर्माती कंपनी आहे. त्यामुळे ‘लाईव्हवायर’ या बाईकची किंमत काही लाखांमध्ये असणार आहे. 2014 साली हार्ले-डेव्हीडसनने ‘लाइव्हवायर’ मॉडलचे सादरीकरण केले होते. या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटीबरोबर 4.3 इंच टीएफटी डिस्प्ले, एबीएस आणि ट्रँक्शन -कंट्रोल सिस्टमसारख्या सुविधाही आहेत. तसेच स्पोर्ट, रोड, रेन, रेंज आणि तीन कस्टम मोडचाही या बाईकमध्ये समावेश आहे. बाईकमधील इलेक्ट्रिक मोटर 105 एचपी आणि 116 एनएम टॉर्क उत्पन्न करते. ही बाईक 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते. बाईकला एसी वॉल सॉकिट पूर्ण चार्ज करण्यासाठी 12.30 तास इतका वेळ लागतो. तर डीसी फास्ट-चार्जरने ही बाईक 1 तासात पूर्ण चार्ज होईल. पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक शहरात 235 किलोमीटर आणि हायवेवर 113 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापेल, असा कंपनीचा दावा आहे.

अमेरिकी बाजारात या बाईकची किंमत 21 लाख रुपये तर भारतीय बाजारात या बाईकची किंमत 32 ते 35 लाखांपर्यंत असेल.

Related posts: