|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईस्कॉनतर्फे जन्माष्टमी उत्साहात साजरी

ईस्कॉनतर्फे जन्माष्टमी उत्साहात साजरी 

 बेळगाव-

येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 23 रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाचपर्यंत अभिषेक, त्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे प्रवचन आणि महाप्रसाद झाला. मुख्य कार्यक्रम शनिवार दि. 24 रोजी झाला. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत भजन कीर्तन झाले. दिवसभरात हजारो भाविकांनी भेट देऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. सायंकाळी 7 ते 8.30 पर्यंत अनेक मान्यवरांचा अभिषेक संपन्न झाल्यावर रात्री 9 ते 10.30 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. ईस्कॉनच्या भक्तांनी बनविलेली नाटय़लीलाही सादर करण्यात आली. रात्री साडेदहा ते मध्यरात्रीपर्यंत ईस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाल्यानंतर श्रीकृष्ण जन्म सोहळा प्रचंड जयघोषात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या महाआरती व महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला.

आज प्रभूपादांचा जन्मदिन

रविवार दि. 25 रोजी ईस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिवस-अविर्भाव दिन ‘व्यासपूजा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुष्पांजली, भाषणे, आरती व महाप्रसाद होईल. या कार्यक्रमात भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: