|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जमिनीचा मालकी हक्क मिळेपर्यंत भूमिपुत्र संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार

जमिनीचा मालकी हक्क मिळेपर्यंत भूमिपुत्र संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार 

वाळपई  प्रतिनिधी:

 गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न अजूनही अधांतरीच राहिलेला आहे. अनेक सरकारे येऊन गेली असतानाही या समस्येकडे कोणत्याही सरकारने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. भूमिपुत्र संघटनेतर्फे  जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा यासाठी सुरू केलेले आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही. निदान आतातरी जमीन मालकांनी या मुद्यावर जागरूक होणे गरजेचे असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम जमीन मालकांना भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्?चंद्र गावस यांनी दिला आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील माळोली याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपुत्र संघटनेच्या बैठकीत त्यांनी आंदोलन उभारण्यामागचे निश्चित कारण स्पष्ट केले.

 देवस्थानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र मानकर राम वझरीकर व इतरांची खास उपस्थिती होती .

याप्रसंगी बोलताना हरिश्चंद्र गावस यांनी सांगितले की आज  सत्तरीतील हजारो बांधव आपल्या जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित राहिलेले आहे. शेकडो वर्षापासून जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या लागवडी व उत्पादन घेत असतानाही त्यांना अजून पर्यंत जमिनीचा मालकी हक्क मिळणे ही खरोखर दुर्दैवाची बाब असून याकडे आता सर्व जमीन मालकांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आमचा लढा हा कोणत्याही सरकारच्या विरोधात नसून आम्हाला जमिनीचा मालकी हक्क मिळणे हा आमचा अधिकार असून यासाठी सत्तरी भूमिपुत्र संघटना वेगवेगळय़ा स्तरावर यासाठी लढा देत आहे. काही राजकीय व्यक्ती या संघटनेकडे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पहात असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली.

Related posts: