|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नगरगाव-ब्रम्हकरमळी रस्त्याच्या डागडुजीला आजपासून प्रारंभ

नगरगाव-ब्रम्हकरमळी रस्त्याच्या डागडुजीला आजपासून प्रारंभ 

वाळपई प्रतिनिधी :

 नगरगाव ब्रह्मकरमळी यादरम्यान रस्त्याची झालेली दुर्दशा यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने आज पासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .वाळपई मतदार संघातील नगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱया नगरगाव ते ब्रह्मकरमळी दरम्यानच्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे .यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेक स्तरावर तक्रारी करूनही या रस्त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 यासंदर्भाचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आजपासून ताबडतोब या रस्त्याची डागडुजी सुरू झाली आहे. नगरगाव ते ब्रह्मकरमळी दरम्यान जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून यामुळे चारचाकी वाहन चालका बरोबरच दुचाकी वाहन चालकांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे .यामुळे अनेक स्तरावर त्रास सहन करावे लागत असून यासंदर्भात वृत्त दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झाले होते .याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने  रस्त्याच्या डागडुजीला आजपासून प्रारंभ केला. हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावी अशा प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अँ?ड. शिवाजी देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केले होते. त्याचीही  याखात्याने दखल घेतल्याचे समजते.

 दरम्यान नागरिकांनी या संदर्भात समाधान व्यक्त केले असून गणेश चतुर्थी पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी समाधानकारक व्हावा अशा प्रकारची नागरिकांची धारणा असून गणेश चतुर्थी नंतर ताबडतोब या रस्त्याच्या डांबरीकरण हाती घ्यावे जेणेकरून नागरिकांना भोगावे लागणारे हाल कमी होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .सदर रस्ता पूर्णपणे नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येत असून या रस्त्याचा वापर ब्रह्मकरमळी शेळपे शिंगणे आदी गावातील नागरिक करताना दिसत आहेत. दररोज शेकडो वाहने यारस्त्यावरून फिरत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत असणे अत्यंत गरजेचे असून या रस्त्याच्या एकूण सुविधेकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सातत्याने लक्ष ठेवावे अशा प्रकारचे विनंती नागरिकांनी केली आहे.

 दरम्यान यासंदर्भात वृत्ताचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनीही गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याच्या डागडुजीला ताबडतोब सुरुवात करावी अशा प्रकारचे निर्देश दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आमदार विश्?वजित राणे यांनी गणेश चतुर्थी नंतर ताबडतोब या रस्त्याचे डांबरीकरण यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

 

Related posts: