|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » तरुण पिढीही घेते कीर्तनाचा आस्वाद : कार्तिकी

तरुण पिढीही घेते कीर्तनाचा आस्वाद : कार्तिकी 

कार्तिकी गायकवाड एक गायिका म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हिच कार्तिकी ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा खूप जुन्या काळापासून आहे. संत परंपरेसोबत ही परंपरा चालत आली आहे. या मंचाच्या माध्यमातून कीर्तन छोटय़ा पडद्यावर आले व त्यात निवेदन करण्याची संधी चालून आली. त्यामुळे ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, असे कार्तिकी म्हणते.

कीर्तनाच्या कार्यक्रमाचे निवेदन करत असताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. माझे घराणे हे वारकरी संप्रदायातील असल्याने हा माझ्यासाठी फारच जवळचा विषय आहे. वारकरी संप्रदायाचे संस्कार बालपणापासूनच माझ्यावर आहेत. याचा फायदा निवेदन करताना होतो, असे कार्तिकी म्हणते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात येते. अगदी जीवनातील आपले वागणं-बोलणं, आचार-विचार कसे असावेत हे कीर्तनातून सांगितले जाते. अभंगाच्या निरुपणातून एक चांगल्या पद्धतीची शिकवण देण्यात येते. त्यामुळे कीर्तन हा सामाजिक संदेश देण्याचा एक उत्तम मार्ग आहे, असेही कार्तिकी म्हणते.

तरुण वर्ग कीर्तनाशी संबंधित नाही आहे, असे मला वाटत नाही. युवा कीर्तनकारांची संख्या वाढताना दिसत आहे. कीर्तनाचा आस्वाद घ्यायला येणारी तरुण पिढी सुद्धा आता वाढली आहे. तरुण पिढीला कीर्तनाकडे आकर्षित करून घेण्यात, झी टॉकीजचा सुद्धा मोठा वाटा आहे, असे कार्तिकीला वाटते.

Related posts: