|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मंदी आली रे

मंदी आली रे 

यूपीए सरकारच्या काळात जगभर मंदी येऊन गेली होती. पुन्हा येऊ घातलीय. वाहनउद्योग क्षेत्रात मागणी घटली आहे. पूर्वी मंदी आली तेव्हाही आधी वाहनउद्योग क्षेत्रात मागणी घटली होती. सध्या छोटय़ा कंपन्या बंद पडल्याच्या, कामगार कपातीच्या बातम्या येतच आहेत. सोन्याचे भाव भराभरा वाढत आहेत. हे सगळे गंभीरच आहे. पण आपला उथळ मीडिया हे सारे हास्यास्पद पद्धतीने मांडतो आहे. एका वाहिनीने पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची मागणी घटल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावरून सोशल मीडियात विनोदी आणि आचरट पोस्ट्स झळकल्या. आधी सत्ताधारी पक्षाच्या चाहत्यांनी ‘मंदी नाहीच’ असे मोठमोठे निबंध सोशल मीडियावर लिहिले. पण सरकारनेच आता मंदीविरुद्ध पावले उचलायला सुरुवात केली आहे. मंदी हा हसण्याचा विषय नाही. पण आला दिवस हसून साजरा करण्याच्या मजबुरीत विनोद करून वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा काही विनोदांचे तुषार थेंब… पार्ले कंपनी लवकरच 10,000 कामगारांची कपात करणार अशी बातमी सध्या गाजते आहे. याला जबाबदार असलेली कारणे डॉ. दीक्षित यांनी दिवसातून दोनदाच जेवून वजन, मधुमेह नियंत्रणात आणण्याचा मार्ग लोकांना दाखवला आहे. त्यामुळे लोकांनी बिस्किटे खाणे कमी केले. तस्मात देशहितासाठी दिवेकरांची जीवनशैली उचलून धरण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणेरी लोक पाहुणा आला की शक्मयतो चहा देत नाहीत, दिलाच तर फक्त अर्धा कप चहा देतात, चहाबरोबर बिस्कीटे द्यायची वेळ आलीच तर अगदी मोजून देतात. पुणेकरांनी आपला स्वभाव बदलला तर तेवढीच देशसेवा होईल. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी विरोधक चहापानावर बहिष्कार घालतात. त्यामुळे अशा चहापानात खाल्ल्या जाणाऱया बिस्किटांचा खप मार खातो. इथून पुढे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकावा, पण बिस्किटे मागून घ्यावीत आणि अधिवेशनाच्या वेळी खावीत. अधिवेशनाच्या काळात मोबाईलवर ‘तसले’ काही  बघण्यापेक्षा बिस्किटे खाल्लेली बरी. फार पूर्वी पुलंनी म्हटले होते की ग्लुकोज बिस्कीट खाण्यापेक्षा काडय़ाची पेटी चहात बुचकळून खायला आवडेल. त्यामुळे पुलंच्या चाहत्यांनी बिस्कीटे खाणे सोडले असण्याची शक्मयता आहे. पुलंच्या चाहत्यांनी निदान काडेपेटय़ा विकत घ्याव्यात आणि त्या व्यवसायाला उर्जितावस्था आणावी.  मंदीवर आम्हाला सुचलेला आणखीन एक उपायआचारसंहिता लागू होण्याआधी नगरसेवक-आमदार आदि बंधूभगिनींनी नेहमीपेक्षा जास्त भेटवस्तूंची खरेदी करावी आणि नागरिकांना सणाचे वाणवाटप करावे.

Related posts: