|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीत ट्रकचालकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीत ट्रकचालकाचा मृत्यू 

 ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.

नूर मोहम्मद डार असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डार हे जरादीपुरा उरानहाल येथील रहिवाशी होते. काल संध्याकाळी घरी जात असताना सुरक्षा रक्षकांची गाडी म्हणून आंदोलकांनी त्यांच्या ट्रकवर दगडफेक केली. या दगडफेकीत डार यांच्या डोक्मयाला गंभीर जखम झाली. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related posts: