|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » मारुतीने 3 हजार कंत्राटी कर्मचारी कमी केले

मारुतीने 3 हजार कंत्राटी कर्मचारी कमी केले 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑटो क्षेत्रामध्ये सध्या असलेल्या मंदीच्या वाऱयामुळे मारुती सुझुकीने 3 हजार कंत्राटी कर्मचारी कमी केले आहेत. तर पायाभूत सुविधा विभागाला चालना देण्यासाठी राज्य सरकारांनी आपली जबाबदारी लक्षात न घेतल्यास मोदी सरकाराचे 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय खंडीत होण्याचे संकेत असल्याची माहिती मारुतीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी मंगळवारी दिली आहे.

ऑटो क्षेत्रात बेरोजगारी वाढण्याची शक्यता

 ऑटो क्षेत्र राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोजगार देतात. परंतु सध्या मंदीच्या फटक्यामुळे बेरोजगारी वाढण्याची मोठे संकेत असून ऑटो क्षेत्रातून मिळणारा मोठय़ा प्रमाणातील महसूलावर यांचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.  देशातील 9 राज्यांनी रस्त्याचा कर वाढविलेला असल्याने वाहनांच्या किंमती जवळपास 97 हजार रुपयापर्यंत वाढत गेल्या आहेत. तर एका अहवालानुसार या राज्यांतील वाहन विक्री सर्वात वेगाने घटत गेल्याची माहिती सादर केली आहे.

Related posts: