|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » नाना पटोले यांच्या निषेधार्थ एसटी कामगारांचे आंदोलन

नाना पटोले यांच्या निषेधार्थ एसटी कामगारांचे आंदोलन 

ऑनलाइन टीम / सोलापूर : 

काँग्रेसचे राज्याचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांच्या निराधार वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बुधवार पेठ येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालयसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांच्या विरोधत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन राज्यभर सर्व विभागीय कार्यालय व आगार प्रवेशद्वार समोर करण्यात आले.

शिवसेनेने एसटी महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर प्रत्येक प्रवासाच्या तिकिटासाठी 1 रु. वाढीव घेण्याचा धंदा सुरू केला आहे. राज्यभरात दिवसाला 67 लाख लोक एसटीने प्रवास करतात. ही 67 लाखाची रक्कम कोणत्याही हिशोबा शिवाय मातोश्रीवर पोहचते. त्यातूनच त्यांचा कारभार सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. या निषेधर्थ हे आंदोलन करण्यात आले.

मातोश्री हे तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असल्याने या बेछूट आरोपाने कामगार सेनेत संतापाची लाट उसळली आहे. प्रसिद्धीच्या मोहाने पछाडलेल्या व बुद्धीचे दिवाळे निघालेल्या नेत्याने असे विधन करू नये. ज्या काँग्रेस पक्षाचे अर्थमंत्री चिदंबरम सीबीआयच्या कोठडीत आहेत, ज्यांना न्यायालयाने सुद्धा जामीन नाकारला तसेच ज्या काँग्रेस पक्षाने देश अधोगतीला नेला. पुरावा असल्याशिवाय सवंग प्रसिद्धीसाठी असले उद्योग करू नये. झालेल्या चुकीबद्दल नाना पटोले यांनी मातोश्री विधनाबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा खासदार अरविंद सावंत, हिरेन रेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्यावतीने राज्यात सर्वच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

 

 

Related posts: