|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » ‘दगडूशेठ’च्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे उद्घाटन सोमवारी

‘दगडूशेठ’च्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे उद्घाटन सोमवारी 

पुणे /  प्रतिनिधी : 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या  127 व्या वर्षानिमित श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे, गणेश चतुर्थीला म्हणजे येत्या सोमवारी सकाळी 11, याजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येधील प.प.विश्वात्मक ओम गुरूदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रीची प्रतिस्थापना होणार आहे. तर, मंदिरावराल विद्युतरोषणाईचे उदघाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते वाहतक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरीयांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिस्थापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्री ची आगमन मिरवणुक काढण्यात येणार आहे. फूलांनी साकारलेले 21 नाग रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. दुपारी 12.20 वाजेपर्यंत प्राणप्रतिस्थापना कार्यक्रम होणार आहे.

यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ऑडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशीत्सवात टूरस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकाकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक लाईटसने विद्युतरोषणाई करण्यात येत आहे. मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा 225 झुंबर लावण्यात आली आहेत.

 3 सप्टेंबरला पहाटे 6 वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवषीप्रमाणे 25 हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. त्यानंतर सकाळी 9 वाजता गणेशयागाचा शुभारंभ प.पू.गुरुवर्य योगिराज भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणराया चरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, अग्निहोत्र यांसह उत्सवात वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे 5 पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 यावेळेत मिलींद राहरकर शास्त्री व दुपारी 12 ते 4 यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे.   अनंत चतुर्दशीला दिनांक 12 सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री विकटविनायक रथातून निघणार आहे.

Related posts: