|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » कर्नाटक : शिवकुमार यांची होणार ईडीकडून चौकशी

कर्नाटक : शिवकुमार यांची होणार ईडीकडून चौकशी 

ऑनलाइन टीम / बेंगळुरू : 

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरील कारवाईनंतर आता काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार अडचणीत आले आहेत. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्मयता आहे.

या पूर्वी गुरुवारी कर्नाटक हायकोर्टाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत शिवकुमार यांनी ईडीचे समन फेटाळून लावण्याची मागणी केली होती. शिवकुमार यांच्याविरोधत बेहिशेबी संपत्तीबाबतचे प्रकरण सुरू आहे. गेल्या वषी ईडीने शिवकुमार यांच्यासह इतरांवर मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. याबाबत अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित कर चोरी आणि हवाला प्रकरणाच्या आधरे त्यांच्याविरोधत काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

दरम्यान, याविषयी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी मागील दोन वर्षात माझ्या आईच्या नावे असणारी संपत्ती वेगवेगळय़ा तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप केला आहे.

 

 

Related posts: