|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » धुळे : केमिकल कंपनीत स्फोट, 13 ठार

धुळे : केमिकल कंपनीत स्फोट, 13 ठार 

ऑनलाइन टीम / वाहाडी : 

शिरपुरमधील वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरडय़ांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटामुळे दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. या स्फोटाने शिरपुरसह आजुबाजुची गावांना मोठा हादरा बसला.

मिळालेली माहिती अशी की, स्फोट झाला तेव्हा फॅक्टरीत 100 कामगार काम करत होते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या 4 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

Related posts: