|Thursday, February 27, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ट्विटरच्या सीईओंचे अकाउंट हॅक

ट्विटरच्या सीईओंचे अकाउंट हॅक 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे अकाउंट शुक्रवारी रात्री हॅक झालं होतं. त्यानंतर हॅकरनं आक्षेपार्ह ट्विट केले. यामध्ये वंशभेदी टीकेसह ट्विटरचं मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती. अकाउंट हॅक झाल्याचं समजताच सर्व ट्विट डिलीट करण्यात आली.

हॅकर्सच्या एका गटाने जर्मनीतील नाझींच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. ट्विटरच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की, जॅक डोर्सींचं अकाउंट हॅक झालं आहे. आम्ही याची चौकशी करत आहोत. जॅक डोर्सींच्या ट्विटरवर काही ट्विट अर्ध्या तासाहून अधिक वेळ तसेच दिसत होते. त्यानंतर ट्विटरच्या टेक टीमने त्यांचे अकाउंट रिकव्हर केलं.

दरम्यान ट्विटरच्या युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. टू स्टेप व्हेरिफिकेसन ट्विटरच्या संस्थापकांचं अकाउंट सुरक्षित ठेवू शकत नाही तर युजर्सचं काय.

 

Related posts: