|Friday, November 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » साजणा’च्या सेटवर वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

साजणा’च्या सेटवर वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन 

झी युवा वाहिनीवरील ‘साजणा’ ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. प्रताप आणि रमा यांची ही प्रेमकहाणी हिट झाली आहे. यात संपूर्ण टीमची मेहनत महत्त्वाची होतीच, पण कलाकारांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम, हे सुद्धा याचे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकतेच या मालिकेचे 100 भाग पूर्ण झालेत. हा आनंदाचा दिवस मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला. याच दिवशी, ‘साजणा’मधील रमा, अर्थात पूजा बिरारी हिचा वाढदिवस होता. सेटवर तिचा वाढदिवस सुद्धा दणक्यात साजरा करत कलाकारांनी त्यांच्यातील मैत्री आणि प्रेमाचे बंध उत्तम असल्याचे दाखवून दिले.

Related posts: