|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » अमित चारी घेऊन येत आहेत ‘बाप्पा मोरया’

अमित चारी घेऊन येत आहेत ‘बाप्पा मोरया’ 

प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होते; हे सर्वश्रुत आहे. गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन येत आहेत, ‘बाप्पा मोरया’ हा खास अल्बम. पेशाने व्यावसायिक असलेले अमित चारी आपली संगीत क्षेत्रातील वाटचाल बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोटस कलर्स ऍडव्हर्टायझिंग अँड मार्पेटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तूत ‘बाप्पा मोरया’ हा अल्बम नुकताच भाविकांच्या भेटीला आला आहे.

व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱया ‘प्राऊड टू बी अ वुमन’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱया अमित चारी यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती. ही आवड त्यांनी ‘बाप्पा मोरया’ या मराठी अल्बमच्या निमित्ताने जपली. आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमित यांनी मात्र कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातफभाषेला प्राधान्य दिले.