|Saturday, February 22, 2020
You are here: Home » मनोरंजन » सिंधूमध्ये मोदक, आरती अन् बरंच काही…

सिंधूमध्ये मोदक, आरती अन् बरंच काही… 

गणेशोत्सवात सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्थातच ‘सिंधू … एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट’ या मालिकेचा सेटही त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त 19 व्या शतकात गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा हे यानिमित्त छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळेल. इतकेच नाही तर गणेशोत्सवादरम्यान येणार कथेत एक रंजक ट्विस्टही येईल.

येत्या आठवडय़ात, देवव्रतसह घरातले सगळे मोठे वाजतगाजत कसे घरी गणपती आणतात हे बघायला मिळेल. मालिकेच्या सुरुवातीपासून सिंधू आणि बाप्पा यांच्यात एक वेगळे नाते असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अर्थातच ही लहानगी त्याच्या आगमनासाठी उत्साही आहे. त्यामुळे नववधू सिंधूच्या हातून रानडे यांच्याकडील बाप्पाला ओवाळण्यात येईल. वाडय़ात बाप्पा, आरती, मोदक असे एकूणच मंगलमयी वातावरण असेल. गणपती बाप्पासारखेच देवव्रतलाही मोदक अतिप्रिय आहेत. त्याची भूमिका ही खादाड दाखवळल्याने तो काय गंमत करतो हे बघण्यासारखे ठरेल.

Related posts: