|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » प्रीतम कागणेची ‘विजेता’मध्ये एंट्री

प्रीतम कागणेची ‘विजेता’मध्ये एंट्री 

बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई यांच्या चित्रपटांची जादू आजही चित्रपट रसिकांना भुरळ पाडते. प्रेक्षकांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात हातखंडा असणाऱया सुभाष घईंच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे दर्जेदार कथाविषय, नयनरम्य लोकेशन्स, सुमधुर संगीत आणि कुशाग्र कलाकार. विशेष म्हणजे ब्युटी विथ ब्रेन अभिनेत्रींची चित्रपटांमध्ये वर्णी. प्रत्येक होतकरू कलाकारांना आकर्षित करणारी मुक्ता आर्टस् निर्मिती संस्था ‘विजेता’ हा आपला पहिलाच मराठी चित्रपट घेऊन येत असून, या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रीतम कागणे या गुणी अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. प्रीतम मराठी चित्रपटसफष्टीचा नवा चेहेरा म्हणून आज नावारूपास येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘हलाल’ चित्रपटातून पदार्पण करणारी ही कुशल अभिनेत्री पदार्पणापासूनच प्रेक्षकमनाची नाडी ओळखण्यात विजेती ठरत आली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

रोहन नाईक, मुंबई

Related posts: