|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » गणेशोत्सवाबाबत शंकानिरसन

गणेशोत्सवाबाबत शंकानिरसन 

बुध. दि. 4 ते 10 सप्टेंबर 2019

गणेशाचे आगमन झालेले आहे. या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. गणपती किती दिवसाचा पुजावा अशी विचारणाही अनेक जण करतात. पूर्वीच्या काळी मातीचा गणपती बनवून त्याची विधीवत पूजा करून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करीत असत. दीड, पाच, सात किंवा 11 दिवसाची प्रथा ही हौसेखातर असते. गणपती कितीही दिवस ठेवला तरी त्यात काही फरक पडत नाही. सोयर सुतक अथवा इतर कारणामुळे चतुर्थीला गणपती आणता येत नाही, अशावेळी इतर दिवशी आणल्यास चालेल का, असा प्रश्न विचारतात. चतुर्थीला महत्त्व आहे. त्यामुळे तो दिवस चुकला तर नंतर गणपती आणू नये. चतुर्थीचे महत्त्व इतर तिथीला येत नाही. घरात करणारे कुणी नसतात. मासिक पाळी वगैरे अडचणी नोकरी व्यवसाय व तत्सम करणे असता काय करावे, असा संभ्रम निर्माण होतो. अशावेळी घरी गणपती न बसविता सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसादासाठी फळफळावळे द्यावीत, पैसे वगैरे दिल्यास त्याचा योग्य विनिमय होईलच याची हल्ली खात्री नसते. सार्वजनिक गणपतीची रोज पूजा होत असल्याने त्याचेही पुण्य मिळत असते. नोकरी व्यवसाय अथवा इतर कारणाने गणपती बसविणे जमत नाही. अशावेळी  काहीही विचार न करता ती प्रथा बंद करावा.r तुम्ही मूर्ती आणलात अथवा न आणलात तरी काहीही फरक पडत नाही, पण घरात मात्र गणपती स्तोत्राचे वाचन सुरू ठेवावे. गणपती म्हणजे मुळातच  मांगल्याची देवता आहे. त्यामुळे गणपती आणून तिचे विसर्जन करीपर्यंत त्याच्या पावित्र्याला कोठेही धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. गणेश विसर्जन मिरवणुकीत तर व्यसनांचा अतिरेक दिसून येतो. मंगलमूर्तीसमोर आपण नाचत आहोत हे विसरतात पण पुढे मागे त्याचे अनिष्ट परिणाम मात्र निश्चित जाणवतात. आरती वगैरे करताना आपण काय म्हणत आहोत हेही लोकांना समजत नाही. गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी गणेश अथर्वशिर्षाचे सामूहिक पारायण केले जाते. पुण्यासारख्या ठिकाणी तर हजारो लोक रस्त्यावर व कोठेही बसून अथर्वशीर्ष म्हणत असतात जर या मंत्रांचा पावित्र्यभंग  झाल्यास त्याचे नंतर फटके बसतात. अथर्वशीर्ष हा वैदीक मंत्र आहे. वैदीक मंत्र हे कोठेही व केव्हाही म्हणायचे नसतात. वैदीक मंत्रांचे पावित्र्य न पाळल्यामुळे पुढे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. बेळगावात नदी अथवा समुद्र नाही तरीही लोक मोठय़ा मूर्ती करतात व  नंतर ती मूर्ती पोचविताना ती पाण्यात  बुडावी यासाठी त्या मूर्तीवर अक्षरश नाचतात हे सारे प्रकार बंद व्हायला हवेत. लालबागचा असो किंवा सारसबागेचा असो, जगात गणपती एकच आहे. त्याच्या शाखा नसतात. हा गणपती जागृत तो जागृत असे काहीही नसते. घरातल्याच गणपतीसमोर बसून त्याची  प्रार्थना केली तर त्याची कृपा होतेच. जागृत गणपती अशी जाहिरातबाजी झाली की लोक धावतपळत सुटतात. तेथील कार्यकर्त्याच्याच जीवनात काही फरकत पडत नाही, मग प्रचंड धक्काबुक्की करून क्षणभराच्या दर्शनाने आपले काय भले होणार? गणपती कृपा कशी करणार? याचाही विचार होणे आवश्यक आहे. कोणत्याही देवाची जर रोज विधीवत पूजाअर्चा चालू असेल तर तेथे आपोआपच जागृती येते व त्याची जाहिरात करावी लागत नाही.

मेष

बुद्धिमत्ता  असेल तर ‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ ही उक्ती तुमच्या बाबतीत या सप्ताहात खरी ठरेल. अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील. योग्य व तार्कीक विचारसरणीमुळे तुमचे मुद्दे खोडणे काहीजणांना कठीण जाईल, पण बाधिक दोषामुळे शेजारी, नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.


वृषभ

 सातवा गुरु अनुकूल आहे. कुणाचाही विरोध सहज मोडून काढाल. काही जुनाट आजारावर मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले, अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. शनि-राहू प्रतियोग बाधिक दोष निर्माण करणारा आहे. विषारी कीटक, सर्पदंश यापासून धोका. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील.


मिथुन

गुरुची शुभ दृष्टी दशम स्थानावर आहे. नोकरी व्यवसायात उर्जितावस्था येऊ लागेल. हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल. पोलीस केसेसपासून जपा. मित्रमंडळींच्या सल्ल्यापासून दूर रहावे, अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात उत्तम योग.


कर्क

गुरु पाचवा आहे. अत्यंत शुभ योग. मोठमोठे उस्त्रोगधंदे, नोकरी यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. सर्वबाबतीत यश देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. मंगळ, राहू योगामुळे देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. एखाद्याला सल्ला द्यायला जाऊन संकटात पडाल.


सिंह

वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उद्भवतील. सहज केलेली चेष्टा, थट्टामस्करी अंगलट येईल काळजी घ्यावी. प्रवासात त्रास. कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल्। त्यात दैवी साहाय्य लाभेल. लांबचे प्रवास, सहली टाळण्याचा प्रयत्न करा.


कन्या

पराक्रमातील गुरुमुळे दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर जर पवित्र व योग्य जागी असेल तर या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरीत असाल तर काहीजणांना बदलीला सामोरे जावे लागेल.


तुळ

रवि, मंगळाचा शुभयोग. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी होतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धनस्थ गुरुमुळे आर्थिक स्थिती सुधारू लागेल. अनेक किचकट प्रश्न  या आठवडय़ात सुटतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. भाग्योदयास सुरुवात होईल.


वृश्चिक

दशमात रवि, मंगळ बलवान शिवाय गुरु चंद्र, शुभयोगामुळे त्याची चांगले फळे मिळतील. अचानक धनलाभ. विवाह, संतती प्राप्ती अथवा संततीचा उत्कर्ष प्रवासात लाभ. नवनव्या कार्यक्षेत्रात प्रवेशाच्या  दृष्टीने वर्षभर चांगले योग पण वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम योग.धनु

राशीस्वामी गुरुमुळे अध्यात्मिक कार्यशक्तीचा प्रभाव वाढेल. सतत काही ना काही दैवी अनुभव येत राहातील. नको त्या व्यक्तींच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक. पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश. अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यास अनेकांचे सहकार्य लाभेल. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील.


मकर

मंगळ, रवि बलवान अवस्थेत आठव्या स्थानी. गडगंज श्रीमंती योग. आतापर्यंत खोळंबलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. न जुळणारे लग्न ठरेल. काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे.


कुंभ

मंगळ, रवि सप्तमात वैवाहिक जीवन व नोकरी व्यवसायात चांगले बदल घडवील. मातापित्यांच्या बाबतीत सौख्यदायक वातावरण. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व कठीण कामात यश. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. या सप्ताहात कुणाचेही भले करताना दहावेळा विचार करा, अन्यथा संकटात पडाल.


मीन

मंगळ, रवि शुभ असल्याने धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद असतील तर ते कमी होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी. नोकरवर्गात काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक. स्वत:चा बचाव करून इतरांना सहाय करा.

Related posts: