|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जोगींच्या पुत्राला अटक

जोगींच्या पुत्राला अटक 

प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप

विलासपूर 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित यांचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. अमित जोगी यांची 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक प्रतिज्ञापत्रात जन्मस्थळ, जन्मतारीख आणि जातीबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.

माजी आमदार अमित यांच्या विरोधात भाजप उमेदवार राहिलेल्या समीरा पॅकरा यांनी तक्रार नोंदविली होती. जोगींनी प्रतिज्ञापत्रात जन्मवर्ष 1978 नोंदवून सारबहरा गौरेला येथे जन्म झाल्याचे नमूद केले होते. पण प्रत्यक्षात त्यांचा जन्म 1977 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास येथे झाला होता.

राज्यात जंगलराज : अजित जोगी

छत्तीसगडमध्ये कायद्याचे राज्य नसून भूपेश बघेल यांनी जंगलराज निर्माण केले आहे. अमितच्या बाजूने उच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात जात अमितला अटक झाल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा अजित जोगी यांनी केला आहे.

Related posts: