|Monday, January 27, 2020
You are here: Home » Automobiles » महिंद्राचा ‘सुप्रो व्हिएक्स’ मिनीट्रक सादर

महिंद्राचा ‘सुप्रो व्हिएक्स’ मिनीट्रक सादर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपल्या लोकप्रिय ‘सुप्रो’ मिनीट्रक श्रेणीमध्ये नवीन ‘सुप्रो व्हीएक्स’ मिनीट्रक सादर केला आहे.

महिंद्राच्या शक्तिशाली डीआय इंजिनची शक्ती लाभलेला सुप्रो मिनीट्रक व्हीएक्स 26 एचपी आणि 55 एनएम टॉर्क देण्यात सक्षम आहे. अवजड सामान वाहून नेतानाही याचा पिक अप अतिशय चांगला आहे. इतकेच नव्हे तर सुप्रो मिनीट्रक व्हीएक्सची पेलोड क्षमता 900 किलो आहे, याचा कार्गो बॉक्स अधिक जास्त मोठा आहे.

सुप्रो मिनीट्रक व्हीएक्सचे टायर्स जास्त मोठे 13 इंची असून ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएम आहे, त्यामुळे कितीही अवजड सामान असले तरी सुप्रो मिनीट्रक व्हीएक्ससोबत ते सहजपणे पोहोचवले जाऊ शकते. इंधन खर्चात बचत, कमी वेळात जास्त फेऱया करण्याची क्षमता सुप्रो व्हीएक्समध्ये आहे. अधिक सुधारित वैशिष्टय़ांसह या मिनीट्रकची किंमत 4.4 लाख एक्स शोरुम आहे.

Related posts: