|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » स्वरक्षणासाठी भारत मागे हटणार नाही!

स्वरक्षणासाठी भारत मागे हटणार नाही! 

वृत्तसंस्था/ सोल

भारताने इतिहासात कधीच कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही, पण स्वतःच्या रक्षणार्थ ठोस पावले उचलण्यास भारत हयगय करणार नाही. देशाची सुरक्षा कुठल्याही स्थितीत बळकट करणे हा आमचा उद्देश आहे. भारताच्या संरक्षण कूटनीतिचा मुख्य स्तंभ असल्याचे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे बोलताना काढले आहेत. राजनाथ यांनी तेथे आयोजित संरक्षण विषयक चर्चासत्राला संबोधित केले आहे.

राजनाथ यांनी भारतात शतकांपासून प्रचलित 5 तत्वांचाही उल्लेख केला. सन्मान, संवाद, शांतता, सहकार्य आणि समृद्धीच्या विचारांवर काम केल्यास आम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. हिंद-प्रशांत क्षेत्रात परस्परांच्या सौहार्दासाठी काम करणाऱया प्रत्येक देशाला अन्य देशाशी संपर्काची संधी उपलब्ध केली जावी. सागरी तसेच हवाईक्षेत्रावर कुठल्याही प्रकारची बंधने असू नयेत. हिंद-प्रशांत क्षेत्रात खुल्या आणि सर्वसमावेशक विकासाचा भारत पुरस्कार करत असल्याचे राजनाथ म्हणाले.

शेजाऱयांना प्राधान्य

पंतप्रधान मोदींच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणांतर्गत भारत शेजारी देशांना प्राधान्य देत आहे. भारत इंडियन ओशन रिम असोसिएशन (आयओआरए), बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिम्सटेक)मध्ये सामील देशांसोबतचे सहकार्य वाढवत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

सांस्कृतिक संबंध

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध आहेत. बौद्धधर्माचा उदय भारतात झाला आणि पुढील काळात तो दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये फैलावला. सुमारे 2000 वर्षांपूर्वी बौद्धधर्म कोरियात पोहोचला. भारत आणि दक्षिण कोरियात कौटुंबिक संबंध देखील आहेत. महाराणी हेया हांग-ओक  अयोध्येचा यात्रा करत गिम्हेचे राजे सूरो यांच्याशी विवाह करण्यासाठी पोहोचल्या होत्या असे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांनी सोल येथील दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Related posts: