|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘विवो झेड 1 एक्स’ स्मार्टफोन लाँच

‘विवो झेड 1 एक्स’ स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनी ‘विवो’ने आपला बहुप्रतिक्षित ‘विवो झेड 1 एक्स’ हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही.

‘विवो झेड 1’ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेराबरोबरच, 4,500 एमएच क्षमतेच्या बॅटरीचा या फोनमध्ये समावेश आहे. विवोचा हा झेड सिरीजचा दुसरा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 712 जी प्रोसेसरचा पॉवर्ड राहणार आहे. स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्मयता आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरपिंट सेन्सर मिळणार आहे. या फोनबद्दलची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही.