|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कर्तारपूर प्रकरणी पाकचा नवा डाव

कर्तारपूर प्रकरणी पाकचा नवा डाव 

स्वतंत्र शेणीचा व्हिसा देण्याची योजना

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानने कर्तारपूर गुरुद्वाराचे दर्शन घेऊ पाहणाऱया भारतीय शिखांसोबत भेदभाव करण्यासाठी डाव रचला आहे. पाक सरकारने कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा येथे जाणाऱया भाविकांची दोन शेणींमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या शेणीत केवळ भारतीय भाविक असतील तर दुसऱया श्रेणीत जगाच्या अन्य भागांमधून येणाऱया भाविकांना वर्ग केले जाणार आहे.

पाक विदेश मंत्रालयाने ऑनलाईन व्हिसा प्रणाली धार्मिक पर्यटन शेणी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. विदेश मंत्रालयाने दोन प्रकारच्या व्हिसा शेणी निर्धारित केल्या आहेत. भारतातून येणाऱया शिख भाविकांसाठी एक तर जगाच्या अन्य भागांमधून येणाऱया भाविकांसाठी दुसरी शेणी असणार आहे.

भारत आणि पाकिस्तानने भारतीय भाविकांसाठी व्हिसामुक्त यात्रेवर बुधवारीच सहमती दर्शविली होती. पण ही चर्चा आता सीमापार मार्गाच्या मुद्दय़ावरून रखडली आहे. दोन्ही देशांनी प्रतिदिन 5000 भारतीय भाविकांना गुरुद्वाराच्या दर्शनाची अनुमती देण्याबद्दल सहमती व्यक्त केली होती.

भारतीय भाविकांच्या प्रवेशावर सेवा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पाकने मांडला आहे. भाविकांकडून 20 डॉलर्स आकारण्याच्या पाकच्या सूचनेला भारताने विरोध दर्शविला आहे. विशेष दिनी कुठल्याही गुरुद्वारात दर्शनासाठी शुल्क आकारले जात नसल्याची भूमिका भारताने मांडली आहे. प्रस्तावित मार्गिका कर्तारपूरच्या दरबार साहिबला गुरदासपूरच्या (पंजाब) डेरा बाब नानकशी जोडणार आहे.

Related posts: