|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आर्य मूळचे भारताचेच असल्याचे स्पष्ट

आर्य मूळचे भारताचेच असल्याचे स्पष्ट 

राखीगढीमधील उत्खननाच्या निष्कर्षातून सत्य झाले स्पष्ट

वृत्तसंस्था/ हिसार

 आर्य बाहेरून (विदेश) आले होते का किंवा ते भारताचेच रहिवासी होते या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. हरियाणाच्या हिसार जिल्हय़ाच्या राखीगढी येथे झालेल्या हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत. राखीगढीमध्ये प्राप्त झालेल्या 5000 वर्षे जुन्या सांगाडय़ांच्या अध्ययनानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार आर्य हे भारताचेच मूळ निवासी होते आणि ते बाहेरून आले नव्हते असा महत्त्वाचा खुलासा झाला आहे. भारतीय लोकांच्या गुणसूत्रामध्ये मागील हजारो वर्षांमध्ये कुठलाच मोठा बदल झाला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आर्य भारताचेच मूळ निवासी होते, असे संशोधनातून समोर आले आहे. राखीगढीमध्ये मिळालेल्या सांगाडय़ांच्या अवशेषांची वैज्ञानिकांनी डीएनए चाचणी करण्यात आली होती. प्राचीन आर्यांच्या डीएनए अहवालाशी नवा अहवाल जुळत नसल्याचे आढळून आले आहे. अशा स्थितीत आर्य बाहेरून भारतात दाखल झाल्याचे गृहित चुकीचे सिद्ध होते.

9000 वर्षांपूर्वी भारतातील लोकांनी शेती कार्यास प्रारंभ केला होता, असेही संशोधनातून समोर आले आहे. भारतानंतर इराण आणि इराकमार्गे कृषी पद्धत जगभरात पोहोचली होती. भारताच्या विकासात येथील लोकांचेच योगदान आहे. कृषी, विज्ञानासह अनेक क्षेत्रांचा प्राचीन भारतात वेळोवेळी विकास होत राहिला आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि जेनेटिक डाटाद्वारे ही बाब पूर्ण जगाने मान्य केली आहे. इतिहास केवळ लेखी नोदींना मानतो, पण वैज्ञानिक पुराव्यांना अधिक महत्त्व देतात. राखीगढीमधील उत्खननात हडप्पा काळात सरस्वती देवीची पूजा होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच त्या काळात होमहवनही केले जायचे.

Related posts: