|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन

झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन 

हरारे

झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. सिंगापूर येथे काही महिने त्यांना अज्ञात आजारामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. श्वेतवर्णीय अल्पसंख्याकांच्या राजवटीतून ऱहोडेशियाला मुक्त करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. नंतर त्यांच्याच एकनि÷ लष्करशहांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती. 1980 ते 2017 असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशाला आपल्या वज्रमुठीत दडपून ठेवले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये मुगाबे यांना अपमानास्पद पद्धतीने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. स्वातंत्र्यलढय़ात राजकीय कैदी असलेल्या मुगाबे यांनी 1980 च्या निवडणुकीत सत्ता हस्तगत केली होती.

Related posts: