|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय किसान संघाकडून कृषी सचिवांची भेट

भारतीय किसान संघाकडून कृषी सचिवांची भेट 

प्रतिनिधी/ काणकोण

मागच्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकात आलेला दुष्काळ व नुकताच आलेला पूर याअनुषंगाने भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच गोव्याच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सचिव कुलदीप सिंह यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. विविध राज्यांत आलेला पूर व दुष्काळामुळे गोव्यात भेडसावणारी पशुखाद्याची वाढती टंचाई तसेच येणाऱया काळात दूध उत्पादकांना भेडसावणार असलेल्या अडचणी यावेळी सचिवांसमोर मांडण्यात आल्या.

या शिष्टमंडळात किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष बाबू कोमरपंत, संजीव पुंकळय़ेकर, अनीषा सामंत, श्रीरंग जांभळे यांचा समावेश होता. कृषी खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई हेही याप्रसंगी उपस्थित होते. गोव्यात सध्या दिवसाला 200 मेट्रिक टन इतका सुका चारा लागतो. त्यामुळे कर्नाटक सरकारकडे यासंबंधी चर्चा करणे आवश्यक आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश या राज्यांतून चारा आणून दुग्ध सहकारी संस्थेमार्फत शेतकऱयांना वितरित करावा, उच्च दर्जाचा सकस चारा परदेशातून आयात करण्यात यावा, एपीएमबी आणि पीडीएसचे जी गोदामे विनावापर पडून आहेत त्या ठिकाणी चारा साठवून ठेवण्याची सोय करण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

खराब चाऱयाचा वापर अन्य कामांसाठी करण्यात यावा. ऊसाच्या चिपाणीचा वापर जनावरांचा चारा तयार करण्यासाठी करणे शक्य आहे. भातकापणी यंत्रामुळे गवताची जी नासाडी होते त्याचाही वापर करण्याची योजना तयार करण्यात यावी. जनावरांचे खाद्य आयात करण्याच्या बाबतीत प्रवास खर्चात सवलत देण्यात यावी. दुधावरील सध्या असलेली 7.33 टक्के आधारभूत किंमत 15 टक्के इतकी वाढविण्यात यावी. त्याचबरोबर सहकार खात्याच्या माध्यमातून शेतकऱयांना अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात यावा आणि कामधेनू योजना जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी, अशा मागण्या भारतीय किसान संघाने निवेदनातून केल्या आहेत

Related posts: