|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » मुसळधार पावसात ‘मोलकरीण बाई’चे शूटींग

मुसळधार पावसात ‘मोलकरीण बाई’चे शूटींग 

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजा जोरदार बरसतोय. अतिवफष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. कितीही पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झाले तरी मुंबई थांबत नाही. मुंबईकरांचे स्पिरिट त्यांना थांबू देत नाही. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या बाबतीतही काहीसे असेच घडले. ‘मोलकरीण बाई’ मालिकेत गणपती विसर्जनाचा भाग चित्रित करण्याचे ठरले होते. त्यासाठी ठाण्यामध्ये बाप्पाच्या विसर्जनाचा सिक्वेन्स शूट होणार होता. तुफान पावसामुळे चित्रिकरणात बऱयाच अडचणी येत होत्या. मात्र कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमने पावसाचे आव्हान स्वीकारत धो धो पावसात चित्रीकरण पूर्ण केले. गणपती विसर्जनाचे शूटिंग आणि त्यात दुर्गाबाई म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्या अपहरणाचा सीन शूट होत असल्यामुळे संपूर्ण टीमवर मोठी जबाबदारी होती. रिअल

लोकेशनवर शूट होत असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दीही जमली होती. मात्र, कोणतीही तक्रार न करता मोलकरीण बाईच्या संपूर्ण टीमने जिद्दीने आणि चिकाटीने हा सीन उत्तमरित्या पूर्ण केला.

 ‘मोलकरीण बाई’ मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱया सारिका नवाथे शूटिंगच्या रोमांचक अनुभवाविषयी म्हणाल्या, हा वेगळा अनुभव होता. पावसाचा अंदाज घेऊन लवकरच सेटवर पोहोचलो. मात्र, पावसाचा जोर वाढतच गेला. शूटिंग रखडले होते. फावल्या वेळात आम्ही अंताक्षरीचा डाव खेळत सेटवर मैफल जमवली. मात्र, शूटिंग पूर्ण करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे थोडा धीर करत भर पावसात सीन द्यायचा ठरवले. पावसात भिजल्यानंतर भीती कुठच्या कुठे पळून गेली. कोणतीही गोष्ट दिलखुलासपणे स्वीकारावी असे मला वाटते. एरव्ही पावसात भिजण्याचे धैर्य होत नाही. मात्र, मालिकेमुळे एक दिवस पावसात भिजण्याचा संपूर्ण टीमनेच मनमुराद आनंद लुटला. ‘मोलकरीण बाई’ सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.