|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा हंगामा

खेड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा हंगामा 

प्रतिनिधी/ खेड

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱया मांडवी एक्स्प्रेसचे दरवाजेच न उघडल्याने प्रवाशांना खेड स्थानकात तिष्ठत बसावे लागले. त्यातच रत्नागिरी-एलटीटी हॉलिडे स्पेशल गाडीमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास आंजणीनजीक बिघाड झाल्याने संतप्त प्रवाशांनी हंगामा केला.

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी रविवारपासून परतीची वाट धरल्याने सर्वच रेल्वेगाडय़ा गर्दीने धावत आहेत. रेल्वेगाडय़ांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजता दाखल झालेल्या मांडवी एक्स्प्रेसचे दरवाजेच उघडले नाहीत. तिकिटे आरक्षित असतानाही प्रवाशांना रेल्वेगाडीमध्ये प्रवेश मिळाला नाही. हे सर्व प्रवासी रेल्वे स्थानकातच ताटकळत उभे होते.

रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी-एलटीटी हॉलिडे स्पेशलची घोषणा केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र या हॉलिडे स्पेशलच्या इंजिनचे पाईप तुटल्याने रेल्वेगाडीला आंजणी रेल्वेस्थानकात थांबा देण्यात आला. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकाच्या नियंत्रण कक्षात जाऊन अधिकाऱयांना धारेवर धरत हंगामा केला. या ठिकाणी तैनात जादा रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी संतप्त प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवासी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंजणीनजीक बिघाड झालेली हॉलिडे स्पेशल सायंकाळी 6.20 वाजता स्थानकात दाखल झाल्यानंतर संतप्त प्रवासी शांत झाले. 

 

Related posts: