|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सिद्धरामय्या सरकारमधील पाच घोटाळय़ांची चौकशी करा

सिद्धरामय्या सरकारमधील पाच घोटाळय़ांची चौकशी करा 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा आदेश

माजी कृषीमंत्री कृष्णभैरेगौडा, के. जे. जॉर्ज अडचणीत येण्याची शक्यता

प्रतिनिधी/ बेंगळूर

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या काळात घोटाळे झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याची दखल घेत पाच घोटाळय़ांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिले आहेत. 9014 कोटी रुपयांचा कृषीभाग्य घोटाळा, 1066 कोटींचा कचरा विल्हेवाट घोटाळा, 4010 कोटींचा वैज्ञानिक कचरा प्रक्रिया प्रकल्प घोटाळा, कचरा विल्हेवाट लावणाऱया वाहन खरेदी व्यवस्थापन घोटाळा आणि मिट्टीगानहळ्ळीसह अन्य गावातील खाणीसंबंधी 109 कोटींचा घोटाळा या सर्व घोटाळय़ांचा तपास करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री येडियुराप्पांनी दिला आहे.

या घोटाळय़ांबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे, अशी सक्त ताकीदही येडियुराप्पांनी दिली आहे. तसेच कृषीभाग्य योजनेतील 131 तालुक्यातील संबंधित जिल्हा कृषी संचालकांनी स्वतः पडताळणी करावी. तसेच याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

माजी मंत्री कृष्णभैरेगौडा, कृषी खात्याचे मुख्य सचिव, 26 जिल्हय़ांमधील कृषी खात्याचे संचालक, 131 तालुक्यातील उपसंचालक आणि कचरा विल्हेवाट घोटाळय़ाला संबंधित के. जे. जॉर्ज, 41 कचरा विल्हेवाट कंत्राटदार, टीपीएस प्रमुख असल्याचा आरोप आहे. यामुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी बेंगळूर महानगर पालिकेने एका वर्षाला 1067 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला असून याची चौकशी करावी, अशी मागणी एन. आर. रमेश यांनी केली आहे. सुमारे 4010 कोटी रुपये खर्च करून सात वैज्ञानिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. मात्र यापैकी अनेक प्रकल्प बंद आहेत. तसेच अन्य साहित्य खरेदीसह देखभालीसाठी कोटय़वधी रुपये अनावश्यक खर्च करण्यात आला आहे.

Related posts: