|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘इस्रो’कडून आनंदवार्ता

‘इस्रो’कडून आनंदवार्ता 

ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती प्राप्त : थर्मल छायाचित्र  कॅमेऱयात कैद

@ बेंगळूर / वृत्तसंस्था

‘चांद्रयान 2’ मोहिमेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली. सॉफ्ट लँडिंग करत असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. मात्र आता चंद्राभोवती फिरणाऱया ऑर्बिटरला विक्रम लँडरचा शोध लागला आहे. ऑर्बिटरने लँडरचे थर्मल छायाचित्रही कॅमेऱयात कैद केले असून ते लवकरच सर्वांसमोर जारी केले जाणार असल्याचे सिवान यांनी स्पष्ट केले.

चंद्राच्या पृ÷भागापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असतानाच चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याने इस्रोचे शास्त्रज्ञ हताश झाले होते. मात्र, त्यानंतर दुसऱयाच दिवशी विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश आले आहे. इस्रोची टीम अवकाशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. शिवाय आपण लँडरशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या काळात लवकरच संपर्क होईल, असा विश्वास इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी  व्यक्त केला. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे अंतराळ विश्वात एक नवी उमेद पाहायला मिळत आहे. आता साऱया देशाचे आणि जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष इस्रोकडून येत्या काळात मिळणाऱया अधिकृत माहितीकडे लागले आहे. आम्ही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क होईल, अशी माहिती के. सिवान यांनी दिल्यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

येत्या काळात 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोकडून सातत्याने करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला भारताची ही चांद्रयान 2 मोहीम 95 टक्क्मयांपर्यंत यशस्वी झाली आहे. त्यातच आता लँडरशी संपर्क होत असण्याच्या प्रक्रियेत प्रगती पाहता ही मोहीम शंभर टक्के पूर्णत्वास नेण्याचा इस्रोचा मानस आहे. देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. 7 सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून 55 मिनिटांनी या चांद्रमोहिमेतील शेवटच्या 15 मिनिटांचा थरार सुरू असतानाच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता.

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतरही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेबद्दल जगभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ही भारतीयांना सुखद धक्का देणारी घडामोड घडल्याने नवा इतिहास निर्माण करण्याची आशा इस्रोच्या शास्त्रज्ञांना आहे.

भविष्यात इस्रोसोबत संयुक्तपणे काम : नासा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-2 मोहिमेचे आणि शास्त्रज्ञांच्या ध्येयवाद व चिकाटीचे जगभरातील अनेक देशांकडून, नागरिकांकडून कौतुक केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही इस्रोच्या या कामगिरीची दखल घेत ‘चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दांमध्ये नासाने भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले. तसेच भविष्यात अंतरळामध्ये संयुक्तरित्या काम करण्याची इच्छाही नासाने ट्विटमधून व्यक्त केली आहे.

Related posts: