|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » नगर- पुणे महामार्गावर बस अपघातात दोन ठार, पंधरा जखमी

नगर- पुणे महामार्गावर बस अपघातात दोन ठार, पंधरा जखमी 

नगर, पुणे / प्रतिनिधी :

नगर-पुणे महामार्गावर ट्रक आणि मिनी बसचा अपघात होऊन बसमधील दोन ठार झाले असून, पंधरा जण जखमी झाले आहेत. पारनेर तालुक्मयातील जातेगाव फाटय़ाजवळ रविवारी रात्री हा अपघात झाला. नगरहून पुण्याकडे जाणाऱया एका ट्रकचा पुढचा टायर फुटून ट्रक डिव्हायडर तोडून नगरकडे येणाऱया मिनी बसवर धडकल्यानं हा अपघात झाला.

जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना शिरुर, सुपा, येथील हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखाल करण्यात आलं आहे. नगरमधील लक्ष्मी वसंत दोमल (वय 65, रा. सातभाई गल्ली, तोफखाना, नगर), विश्वनाथ बाळराम धीमन (वय 50, रा. लोणार गल्ली, नगर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

बसमधील सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते. आळंदीला एका दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी ते गेले होते. कार्यक्रम आटोपून नगरकडे परतत असताना जातेगाव फाटय़ाजळ अपघात झाला. घटनेनंतर पोलिस तत्काळ घटळास्थळी पोहचल्याने जखमींना तातडीने उपचार मिळणे शक्मय झाले. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर नगर-पुणे मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती.

Related posts: