|Saturday, September 21, 2019
You are here: Home » Top News » अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले : संभाजी भिडे

अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले : संभाजी भिडे 

ऑनलाइन टीम /सोलापूर :

अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजमाध्यमातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या शास्त्रज्ञाने भारतीय कालमापन पध्दतीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे .त्यासाठी सोलापुरात आयोजित बैठकीला संभाजी भिडे आले होते. त्यावेळी त्यांनी हे एकादशी आणि अमेरिकेचा संबंध जोडला आहे.

ते म्हणाले, भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतसुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला, असं संभाजी भिडे यांच म्हणणं आहे.