|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » केएमसी कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने रंकाळा चौपाटी स्वच्छता अभियान

केएमसी कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने रंकाळा चौपाटी स्वच्छता अभियान 

कोल्हापूर

      केएमसी कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने रंकाळा चौपाटी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

      यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने घरगुती गौरी गणपती विसर्जनानंतर रंकाळा चौपाटी व जावळाचा गणपती परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेदरम्यान दोन डंम्पर प्लास्टिक व निर्माल्य गोळा करण्यात आले. तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्ती एकत्रित गोळा करण्यात आल्या. या मोहिमेमध्ये एनसीसी विभागाचे चाळीस कॅडेट व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी झाले. सदर मोहीम महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येते. तसेच आनंत चतुर्थीनंतर पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहीम देखील महाविद्यालयाच्या वतीने व 56 महाराष्ट्र बटालियनच्या वतीने राबविण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम आयुक्त, प्राचार्य डॉ. एस. एस. गवळी, कर्नल उदय बारवकर यांच्या मार्गदर्शनाने लेफ्ट अमित रेडेकर यांनी मोहिमेचे यशस्वी नियोजन केलेले आहे.

Related posts: