|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाबुराव घुरकेंना पीएचडी पदवी

बाबुराव घुरकेंना पीएचडी पदवी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

बाबुराव घुरके यांना शिवाजी विद्यापीठातील भूगोल विषयाची पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी ‘लेव्हल्स ऑफ सोशल डेव्हलपमेंट इन कोल्हापूर डिस्ट्रीक्ट: अ जिओग्राफिकल अनालिसिस’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. या विषयासाठी त्यांना मुंबई येथील महाराष्ट्र शासनाच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधील भूगोल विभागप्रमुख डॉ. रतन हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव धनगरवाडा येथील बाबुराव घुरके यांनी गावातच प्राथमिक तर जुगाई हायस्कूल जुगाई येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आयटीआय पूर्ण केल्यानंतर महावीर कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. कमवा व शिका योजनेतून विद्यापीठात पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. अनंत अडचणींचा सामना करीत घुरके यांनी पीएचडी पदवी मिळवली आहे.

Related posts: