|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागर मतदार संघ भाजपचाच

गुहागर मतदार संघ भाजपचाच 

माजी आमदार डा?. विनय नातूंची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी/ गुहागर

गुहागर विधानसभा मतदार संघ हा भाजपचाच असून जनसंघापासून येथून आमचा उमेदवार विजयी होत आला आहे. 10 वर्षापूर्वी वेगळा निर्णय झाला असला तरी युतीच्या वाटपामध्ये ही जागा भाजपाची असून ती भाजपलाच मिळाली पाहिजे. तशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश चिटणीस व माजी आमदार डा?. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पाच जागांपैकी तीन जागा शिवसेनेच्या आहेत. चौथ्या जागेवरही सेनेचा उमेदवार घोषित होत आहे. यामुळे जिल्ह्यात भाजपाला केवळ गुहागर विधानसभा मतदार संघच मिळत असून ती कायम रहाणार आहे. युतीचे वाटप व त्याचे विषय वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुहागरच्या जागेबाबत योग्य निर्णय घेतील.

गेली पाच वर्षे भाजपाने गुहागर विधानसभा मतदार संघाची चांगली बांधणी केली आहे. सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. गणेशोत्सवापूर्वी गुहागर विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यामुळे युतीचा उमेदवार याठिकाणी उभा रहाणार असला तरी गुहागर ही जागा भाजपाची हक्काची असून ती कायम रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: