|Saturday, December 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अमेरिका-तालिबान शांतता चर्चा रद्द

अमेरिका-तालिबान शांतता चर्चा रद्द 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबान यांच्यात होणारी शांतता चर्चा रद्द करण्यात आली आहे. रविवारी ही चर्चा होणार होती; पण काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी शांतता चर्चा रद्द करण्यात आल्याचे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे प्रतिनिधी आणि तालिबानमध्ये दोहा येथे शांतता चर्चा सुरू आहे. याचे पुढील पाऊल म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि तालिबानच्या म्होरक्यांशी चर्चा करणार होते. तालिबानशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्यावतीने झालमय खालिद यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोहा येथे खालिद आणि तालिबानच्या म्होरक्यांमध्ये चर्चेच्या 9 फेऱया झाल्या आहेत. अफगाणमध्ये अमिरेकेचे 14 हजार सैनिक आहेत. यातील साडेपाच हजार सैनिक पुढील पाच महिन्यात परतण्यावर एकमत झाले होते. याच पार्श्वभूमीवर रविवारी ट्रम्प हे कॅम्प डेव्हिड येथे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि तालिबानच्या म्होरक्यांशी चर्चा करणार होते. मात्र या चर्चेपूर्वी दोन दिवस आधी काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये अमेरिकेच्या सैनिकासह 12 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाची जबाबदारी तालिबानने स्वीकारली होती.

Related posts: