|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दक्षिण भारतात हल्ल्याची शक्यता

दक्षिण भारतात हल्ल्याची शक्यता 

गुप्तचर विभागाकडून अतिदक्षतेचे आदेश : सरक्रीक खाडीत संशयास्पद बोटी

लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल सैनी यांची माहिती

पुणे /  प्रतिनिधी

भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील गुजरातजवळील 96 किलोमीटरचा सरक्रीक येथील खाडीच्या प्रदेशाबाबत दोन्ही देशादरम्यान सीमानिश्चिती अद्याप झालेली नाही. या ठिकाणावरून तसेच देशाचे दक्षिण भागातून दहशतवादी कारवाया होऊ शकतात अशी गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आला आहेत, अशी माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.

सरक्रीक भागात सोडून देण्यात आलेल्या काही बोटी सापडल्या आहेत. यासंदर्भात लष्कराकडून तपास करण्यात येत आहे. सरक्रीक भागातील दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागातील लष्करी क्षमता वाढविण्यात आली आहे. दक्षिण भारतातील समुद्रानजिकच्या राज्यांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय लष्कराकडून दहशतवादी हल्ल्याची शक्मयता वर्तवण्यात आल्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्हय़ांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचेही आदेश देण्यात आल्याचे केरळचे पोलीस महासंचालक लोकनात बहेरा यांनी सांगितले.

दक्षिण भारताच्या भूभागावरही दहशतवादी हल्ला होऊ शकतो या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. शत्रू राष्ट्र किंवा दहशतवादी संघटना यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्यांना समर्थपणे तोंड देण्यास आम्ही सक्षम आहे. तशाप्रकारची अधिकची सुरक्षा तयारी आम्ही करत असून शत्रूंचे हल्ल्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही,  असेही सैनी यांनी स्पष्ट केले.

संघर्षाला समर्थपणे तोंड देणार

जम्मू काश्मीरमधील संघर्षाला काही अंतर्गत बाबी बरोबरच बाह्यशक्ती कारणीभूत आहे. काश्मीरबाबत भारताचे धोरण स्पष्ट आहे. या भागात होणाऱया संघर्षाला तोंड देण्याची तयारी केंद्र सरकारची आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार आहे. या परिसरातील धोक्मयांना तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कोणाच्याही धमक्मयांमुळे आमच्या कार्यशैलीत बदल होणार नाही असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

आर्मी लॉ कॉलेजचे भूमिपूजन

राधा कालिदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जुने पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे याठिकाणी आर्मी लॉ विद्यालयासाठी 5 एकर जमिन देण्यात आली आहे. विद्यालयाच्या दुसऱया फेजचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सैनी म्हणाले, सैनिक आणि शहीद झालेल्या कुटुंबाची समाज विशेष काळजी घेताना दिसून येतो. आर्मी लॉ कॉलेजकरिता प्रेम दर्यानानी यांनी पाच एकर जागा देऊन सैनिकांचे मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वांना समान न्याय मिळावा यादृष्टीने विद्यार्थ्यांनी पुढील काळात काम करावे असे ते म्हणाले. यावेळी दर्यानानी म्हणाले, शहीद जवानांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना याठिकाणी फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाईल. लष्करातील जवान देशासाठी प्रतिकूल परिस्थितीत सदैव कार्यरत असतात त्यांचे कार्याचा गौरव म्हणून जमीन त्यांना देण्यात आली आहे. सैनिक व त्यांचे कुटुंबीयाकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.

Related posts: