|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ऐतिहासिक गड किल्ले भाडय़ाने देण्याच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शन

ऐतिहासिक गड किल्ले भाडय़ाने देण्याच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शन 

निवासी जिल्हाधिकाऱयांना निवेदन : 19 लाख कंपन्यांना टाळे

सोलापूर / प्रतिनिधी

केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऐतिहासिक गड, किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या व आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे, आरोग्य, शिक्षण याला विचारण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेटसमोर धरणे व निदर्शन करण्यात आले.

यावेळी जोरजोरात घोषणाबाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदी पसरली असून, या आर्थिक मंदीमुळे 19 लाख कंपन्यांना टाळे लागले आहेत. त्यात 1 लाख 42 हजार कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. यामुळे कोटय़वधी लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेची 5 व्या स्थानावरून 7 व्या स्थानी घसरण झाली आहे. वाहन क्षेत्रात 2 लाख नोकऱयांवर गदा आली आहे. जीडीपी पाच टक्क्यांपर्यंत घसरली असून केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या पैशावर डल्ला मारत आहे. सरकारला देशाचे आर्थिक धोरण राबविण्यात अपयश आले आहे. शेतकरी शेतमजूर आत्महत्यामध्ये वाढ झाली व समाजातील इतर सर्व घटकांना या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारचा वचक नसल्यामुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढले आहे.

या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा-पाटील, महिला शहराध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक बाबा मिस्त्राr, विनोद भोसले, रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तुरे, फिरदोस पटेल, माजी महापौर अलकाताई राठोड, सुशिलाताई आबुटे, सुदीप चाकोते, राजन कामत, संतोष पाटील (दुधनी), अशोक देशमुख, गौरव खरात, राजेश पवार, सुलेमान तांबोळी, राजकुमार पवार, रमझान पठाण, किशोर पवार, अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे, भारत जाधव, युवराज जाधव, ऱख् क्षीरसागर, सिद्राम अट्टेलूर, तिरुपती परकीपंडला, हारून शेख, दत्तू बंदपट्टे, केशव इंगळे, मनीष गडदे, शोकत पठाण, अशोक कलशेट्टी, सुमन जाधव, कोमोरो सय्यद, बसवराज म्हेत्रे, गणेश साळुंखे, अंबादास गुत्तीकोंडा, हसीब नदाफ, नागनाथ कदम, विकास शिंदे, प्रमोद नंदूरकर, अरुणा वर्मा, राजश्री लोलगे, दिलीप जाधव, सिद्राम सळवदे, सौदागर जाधव, रामभाऊ वाघमारे, वीणाताई देवकते, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, लताताई गुंडला, शिल्पा चांदणे, आप्पासाहेब बगले, सहदेव इप्पलपल्ली, रफिक चकोले, नूर अहमद नालवार, संध्या काळे, योगेश मार्गम, विवेक कन्ना, राजासाब शेख, मन्सूर गांधी, आप्पासाहेब गायकवाड, रियाज नाईकवाडी, रियाज मोमीन, रजाक कादरी, प्रतीक शिंगे, मनोज अधटराव, बशीर शेख, अशोक मादगुंडी, अनिल मस्के, जिशान सय्यद, तुकाराम बुवा पंडित, राजा कलेकरी, न्न्अ गायकवाड, सुभाष वाघमारे, शशी जाधव, उपेंद्र ठाकर, संजय गायकवाड, धर्मराज गुंडे, भीमाशंकर जमादार, बिरा खरात, अनिल कोळसे पाटील, विलास डोळसे पाटील, गीता राऊत, मीनाक्षी गायकवाड, रुकैया बिराजदार, करीम शेख, नागेश म्याकल, इरफान शेख, संघमित्रा चौधरी, दीपक फुले, श्रीकांत दासरी, मशाक वलसंगकर, विश्वास गज्जम, यांच्यासह नागरिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.