|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनीतून विसर्ग वाढल्याने पुन्हा पुरस्थिती

उजनीतून विसर्ग वाढल्याने पुन्हा पुरस्थिती 

पुणे जिह्यात जोरदार पाऊस : उजनी व वीर धरण पाण्याची मोठी आवक

वार्ताहर/  बेंबळे

 पुणे जिह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी आणि वीर धरणामध्ये पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा भीमा आणि नीरा नदीच्या काठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 पुणे जिह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे बंडगार्डनमधून 31 हजार 770 तर दौंडमधून 42 हजार 627 पाण्याची आवक उजनी धरणात झालेली आहे. उजनी धरण सध्या 111 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून भिमा नदी पात्रात 70 हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे.  तर नीरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, निरा देवघर ही धरणेही ओव्हर फ्लो झाल्याने वीर धरणातून 23 हजार 235 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. यामुळे भीमा आणि नीरा नद्यांच्या संगम पासून भीमा नदीमध्ये जवळपास 93 हजार क्युसेक पाणी वाहत आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related posts: