|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वडूज बसस्थानकातून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

वडूज बसस्थानकातून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी 

प्रतिनिधी/ वडूज

निमसोड (ता. खटाव) येथील स्वाती सागर मोरे या महिलेचे पर्समध्ये ठेवलेले सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना वडूज बसस्थानकात घडली.

स्वाती मोरे या खारघर (मुंबई) येथे सध्या रहाण्यास असून बेलापूर येथील एका क्रिस्टल कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीस आहेत. गौरी गणपती सणासाठी त्या आपल्या पतीसमवेत सासरी आल्या होत्या. त्या मुंबईला जाण्यासाठी निमसोडहून वडूज बसस्थानकात आल्या होत्या. वडूज बसस्थानकात वडूज सातारा गाडी आली. त्या गाडीत ते चढले. तिकीट काढण्यासाठी पर्स बघितली असता त्या पर्समध्ये ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. यामध्ये अडीच तोळे वजनाचे नेकलेस, साडेपाच तोळे वजनाचे गंठण, सात ग्रम वजनाचे ब्रेसलेट, 22 ग्रम वजनाची अंगठी अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. या सर्व दागिन्यांची बाजारभावानुसार अडीच लाखापेक्षा जास्त किंमत आहे. याबाबत स्वाती मोरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर घटनेचा तपास महिला पो. हवा सविता वाघमारे करीत आहेत.

Related posts: