|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गणेशोत्सवावर महापूराची गदड छाया

गणेशोत्सवावर महापूराची गदड छाया 

प्रतिनिधी/ सातारा

यंदा मुसळधार पावसामुळे जिल्हय़ासह, सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत होवून हजारो लोक बेघर झाले. यांचे पुनवर्सन करण्यासाठी सर्वस्तरावरून मदतीचा हात पुढे आला आहे. यांना मदत करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी भव्य असे जिवंत देखावे सादर करणाऱया गणेश मंडळांनी जिंवत देखावे रद्द केले आहे. या देखाव्यावर होणारा खर्च हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देवून आगळावेगळा उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. देखावे रद्द करण्याचे हे पहिले वर्ष  असून महापूराची गडद छाया यंदाच्या गणेशोत्सवावर पसरली आहे.

  शहरातील गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी नवनवीन विषयावर देखावे सादर करण्यात येतात. गेल्या 10 वर्षापासून जिवंत देखावे सादर करण्याची पंरपरा शहरातील गणेशोत्सव मंडळानी सुरू ठेवली होती. गतवर्षी सामाजिक, ऐतिहासिक संदेश देणारे बालविकास गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर पावशे व सहकाऱयांनी वीर जवान तुझे सलाम हा जिंवत देखावा सादर केला होता. राजकमल गणेश मंडळ अध्यक्ष उदय गुजर यांनी केलेला कोंडाजी फर्जद हा जिंवत देखावा, फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पवार व सहकाऱयांचा संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा, समर्थ गणेशोत्सव मंडळाचा पत्री सरकार हे देखावे पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. भव्य सेट उभारून, आकर्षक सजावट करण्यात आली होती. लहान मुले ते ज्येष्ठ मंडळी हे देखावे बघताना डोळयात साचून राहतील अशा आठवणी सोबत घेवून गेले होते. यंदाही गणेशोत्सवात नवीन विषयावर जिंवत देखावे सादर होणार असा अंदाज बांधला होता. मात्र उशिरा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आणि गणेशभक्तांच्या आनंदावर विरजन पडले.

  सातारा जिल्हय़ासह, सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली. यात हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांच्या पुनवर्सनासाठी सर्वांकडून मदत केली जात आहे. या पूरग्रस्तांसाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला असून यंदा राजकमल गणेशोत्सव मंडळ, बालविकास मंडळ, समर्थ गणेश मंडळ, गजराज, अजिंक्य गणेश या एकाही मंडळाने जिंवत देखावा सादर केला नाही. देखावे उभारण्यासाठी हजारो रूपये खर्च केले जातात. या हजारो रूपयांची बचत करून पूरग्रस्तांच्या पूनवर्सनासाठी ही रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती सर्व मंडळांच्या अध्यक्षांकडून देण्यात येत आहे.

Related posts: