|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Automobiles » लवकरच लाँच होणार टाटाची ‘नेक्सॉन क्राझ’

लवकरच लाँच होणार टाटाची ‘नेक्सॉन क्राझ’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण ‘नेक्सॉन क्राझ’ आकर्षक रंगात लाँच करणार आहे. नुकताच टाटाने यासंदर्भातील टीझर ट्विट केला आहे.

मागील वर्षी टाटाने नेक्सॉन क्राझ लाँच केली होती. त्यामधीलच ही पुढील आकर्षक एडिशन असणार आहे. नेक्सॉन क्राझ एडिशनमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 टर्बो डिझेल इंजिन असेल. दोन्ही इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असणार आहे. क्राझ एडिशन नेक्सॉनच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यात हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी व्हेंट्ससह अन्य फीचर असतील. याशिवाय डय़ुएल प्रंट एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हायस्पीड ऍलर्ट सिस्टमसारखे सेफ्टी फीचर असणार आहेत. टाटा नेक्सॉनचा बीएस 6 मॉडेल या वर्षाअखेरीस बाजारात येऊ शकते. या कारची किंमत अद्याप कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

Related posts: